रक्षाबंधन हा असा सण आहे जो एका विशेष नात्यासाठी साजरा केला जातो. भाऊ आणि बहीण यांचे एक वेगळंच नातं असतं आणि हेच वेगळं नातं आणि हा विशेष सण रजनी फाउंडेशन इंडिया काही विशेष मुलांन बरोबर दरवर्षी साजर करत. या उपक्रमाचा विशेष उद्देश हा असतो की त्या मुलांना आनंद देण. आणि यासाठीच रजनी फाउंडेशन इंडिया दरवर्षी शांतीधाम येथील आश्रमातील मानसिक व शारीरिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या मुलांना भेट देतात. ती मुल देखील समाजाचा एक भाग आहेत व ते ही त्यांच आयुष्य सामान्य माणसाप्रमाणे जगू शकतात याची जाणीव निर्माण व्हावी व त्यांना आनंद मिळावा म्हणून रजनी फाउंडेशन इंडिया चे सभासद दरवर्षी रक्षाबंधनाचा उपक्रम त्यांच्यासोबत साजरा करतात. तेथे गेल्यावर ते त्या मुलांबरोबर अनेक खेळ खेळतात. नृत्य करतात त्या मुलांना फळ मिठाई देऊन त्या मुलांबरोबर अनेक आनंदाचे क्षण घालवतात. फाउंडेशनच्या अनेक सभासदांचा असा अनुभव आहे की ते तेथील मुलांना आनंद देण्याकरता गेलेले असतात परंतु त्यांच्या बरोबर वेळ व्यतीत केल्यानंतर त्यांना स्वतःलाच एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो आणि आनंद दिल्याने वाढतो हे वाक्य येथे खरे ठरत.
त्याच बरोबर नेहमी आपलं कर्तव्य निस्वार्थपणे पार पाडणारे. उन्हाळा असो.पावसाळा असो. हिवाळा असो. सण असो. एखादी आपत्ती असो किंवा महामारी ते नेहमीच त्यांच कर्तव्य निःस्वार्थ पणे पार पाडत असतात. आपण आपल्या घरात सुरक्षित राहावं आणि आपण आपल्या घरी सुरक्षित पोहोचावं म्हणून आपलं अहोरात्र कर्तव्य बजावणारे बेस्ट कर्मचारी व पोलीस हे नेहमीच आपली रक्षा करत असतात. अशीच जनतेची सेवा व रक्षण नेहमीच करत असणारया बांधवांन बरोबर रजनी फाउंडेशन इंडिया चे सभासद दरवर्षी रक्षाबंधन हा सण हा साजरा करतात. ते जनतेच करत असलेल रक्षण व त्यांनी घेतलेली समाज रक्षणाची जबाबदारी किती मोठी आहे व ते ती खूप सुंदर रित्या सांभाळत आहे याबद्दलची कृतज्ञता म्हणून बेस्ट कर्मचारी व मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.
परंतु यावर्षी कोरोना नावाची महामारी आली आणि सर्वकाही ठप्प झालं. सरकारी नियमानुसार अनेक समारंभ, कार्यक्रम, सण देखील रद्द करण्यात आले. रजनी फाउंडेशन’तर्फे साजरा केला जाणारा रक्षाबंधन हा उपक्रम देखील कोरोना व्हायरस सारख्या महामारी मुळे रद्द करण्यात आला आहे. पण या महामारीत देखील पोलिस, नर्स, डॉक्टर, सफाई कर्मचारी आपले कर्तव्य निःस्वार्थपणे बजावत आहेत. देशासाठी व देशातील नागरिकांसाठी महामारीशी लढणाऱ्या व आपल्या स्वतःच्या जिवाची बाजी लावून लोकांना वाचवणाऱ्या रक्षण करणाऱ्या सर्व कोव्हिड योध्यांना रजनी फाउंडेशन इंडिया कडून सलाम.
रक्षाबंधन या दिवशी आपण राखी विशेषता त्यांनाच बांधतो जे आपली रक्षा करतात. तुमच्या सारख्या रक्षणकर्तांच कौतुक करणकयासाठीच रजनी फाउंडेशन इंडिया दरवर्षी हा उपक्रम साजरा करत असत. तुम्ही कोव्हिड योद्धे करत असलेल्या कार्य व सेवा अनमोल आहे. तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा देखीला न करता आम्हा सर्वांची रक्षा करता तुम्हा सर्व कोव्हिड योद्ध्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा !!! आणि तुम्हा सर्वांसाठी काही करता आलं तर सरकारी नियमांचे पालन करू. सुरक्षित राहू. काळजी घेऊ. पुन्हा एकदा नव्याने आपला देश उभा करण्यास तुम्हा सर्व योद्ध्यांना सहकार्य करू आणि पुढच्या वर्षी उत्साहात तुम्हा सर्वं योध्यांच कौतुक करण्यासाठी परत एकदा सालाबादा प्रमाणे तुमच्या सर्वांन सोबत साजरा करू.
– शुभांगी धनुर्धारी
सदस्य, रजनी फाउंडेशन इंडिया